सौर कृषीपंप योजनेत मोठी अपडेट – महावितरणकडून शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना.
Solar Krushi Pump Yojana 2025 Update जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘सौर कृषीपंप योजना 2025’ अंतर्गत सोलार पंप बसवताना कोटेशनशिवाय कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये, असे स्पष्ट आवाहन महावितरणने केले आहे.
Solar Pump Scheme 2025: कोटेशनशिवाय पैसे देऊ नका – महावितरणचा इशारा शेतकऱ्यांकडून खड्डे खोदणे, सिमेंट-वाळूची व्यवस्था करणे किंवा वाहतुकीसाठी पैसे मागण्याच्या तक्रारी काही भागांतून महावितरणकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोटेशनमध्ये नमूद केलेल्या शुल्काशिवाय कोणालाही पैसे देऊ नयेत.
Saur Krushi Pump Yojana – शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ आणि केंद्र सरकारची ‘PM Kusum Yojana (Kusum-B)’ अंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना 95% व इतरांना 90% अनुदान दिले जात आहे. योजनेअंतर्गत सौर पंपांसाठी आकारली जाणारी रक्कम अशाप्रकारे आहे:
3 HP: अनुसूचित जाती-जमाती – ₹11,486 | इतर – ₹22,971
5 HP: अनुसूचित जाती-जमाती – ₹16,038 | इतर – ₹32,075
7.5 HP: अनुसूचित जाती-जमाती – ₹22,465 | इतर – ₹44,929
या शुल्कात सोलार पंप बसवणे, देखभाल, आणि देखरेख यांचा समावेश असतो. त्यामुळे अतिरिक्त रक्कम मागणाऱ्यांपासून सावध राहा.
Shetkari Yojana Complaint: अशी करा तक्रार जर कोणी अतिरिक्त रक्कम मागत असेल, तर शेतकऱ्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. जर तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तर सोलापूर मंडळ कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता कय्युम मुलाणी – 9029114680 यांच्याशी संपर्क साधावा. दोषी सोलार कंपन्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.
Tata Power Solar Project – महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जेचा मोठा विस्तार
राज्य सरकारच्या सार्वजनिक यंत्रणांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी टाटा पॉवरने 230 हून अधिक शासकीय संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रणाली बसविली आहे. यामुळे 107 मेगावॅटची स्वच्छ ऊर्जा निर्मिती झाली असून 1.3 लाख टन CO₂ उत्सर्जनात घट झाली आहे.