पुणे महानगरपालिकेच्या (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी/शिक्षक पदांवरील ५० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या दिनांकांमध्ये ऑफलाइन अर्ज दाखल करावा.
https://majhinaukrinmk.com/pmc-bharti-2025-pune-mahanagarpalika-naukri/
भरतीशीचा तपशील:
- संस्था: पुणे महानगरपालिका (PMC)
- भरती ठिकाण: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे
- एकूण रिक्त पदे: ५०
- अर्जाची पद्धत: ऑफलाइन
- मुलाखतीची तारीख: २० फेब्रुवारी २०२५
- अधिकृत संकेतस्थळ: www.pmc.gov.in
रिक्त पदांचे वितरण:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
प्राध्यापक | ०४ |
सहयोगी प्राध्यापक | ११ |
सहाय्यक प्राध्यापक | १६ |
वरिष्ठ निवासी | १६ |
कनिष्ठ निवासी/शिक्षक | ०३ |
एकूण | ५० |
पदांनुसार वेतन:
पदाचे नाव | मासिक वेतन |
---|---|
प्राध्यापक | ₹१,८५,०००/- |
सहयोगी प्राध्यापक | ₹१,७०,०००/- |
सहाय्यक प्राध्यापक | ₹१,००,०००/- |
वरिष्ठ निवासी | ₹८०,२५०/- |
कनिष्ठ निवासी | ₹६४,५५१/- |
शैक्षणिक पात्रता:
- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी: MD/MS/DNB आवश्यक आहे.
- कनिष्ठ निवासी: MBBS आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
पद | खुल्या प्रवर्गासाठी | मागास प्रवर्गासाठी |
---|---|---|
प्राध्यापक | ५० वर्षे | ५५ वर्षे |
सहयोगी प्राध्यापक | ४५ वर्षे | ५० वर्षे |
सहाय्यक प्राध्यापक | ४० वर्षे | ४५ वर्षे |
वरिष्ठ निवासी | ३८ वर्षे | ४३ वर्षे |
कनिष्ठ निवासी | ३८ वर्षे | ४३ वर्षे |
भरती प्रक्रिया:
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करावा.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता:
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होणार
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२५ (मुलाखतीचा दिवस)