भारतीय रेल्वेने RRB Ministerial Bharti 2025 अंतर्गत 1036 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करावी. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे आयोजित या भरतीमध्ये PGT, TGT, Chief Law Assistant, Public Prosecutor, Librarian, आणि विविध पदांसाठी संधी उपलब्ध आहे.
महत्वाचा तपशील:
- संस्था: भारतीय रेल्वे, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB)
- भरती प्रकार: सरकारी नोकरी
- एकूण पदसंख्या: 1036
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2025
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अधिकृत वेबसाईट: www.rrb.gov.in
रिक्त पदांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 187 |
2 | सायंटिफिक सुपरवायझर (Ergonomics and Training) | 03 |
3 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 338 |
4 | चीफ लॉ असिस्टंट | 54 |
5 | पब्लिक प्रासक्यूटर | 20 |
6 | फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) | 18 |
7 | सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग | 02 |
8 | ज्युनियर ट्रांसलेटर (Hindi) | 130 |
9 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 03 |
10 | स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर | 59 |
11 | लायब्रेरियन | 10 |
12 | संगीत शिक्षिका (महिला) | 03 |
13 | प्राथमिक रेल्वे शिक्षक | 188 |
14 | सहाय्यक शिक्षिका (महिला) | 02 |
15 | लॅब असिस्टंट (School) | 07 |
16 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) | 12 |
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांकडे संबंधित पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. काही प्रमुख पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत:
- PGT: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed.
- TGT: M.A./B.A./12वी उत्तीर्ण + DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
- Chief Law Assistant: विधी पदवी (LLB)
- Public Prosecutor: विधी पदवी + 5 वर्षे वकिलीचा अनुभव
- Junior Translator (Hindi): हिंदी/इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी + अनुवाद डिप्लोमा किंवा 2 वर्षे अनुभव
- Librarian: ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा/पदवी
वयोमर्यादा:
- 18 ते 48 वर्षे (पद आणि प्रवर्गानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे)
- SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सूट
- OBC प्रवर्ग: 3 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/महिला/EBC/ट्रान्सजेंडर: ₹250/-
निवड प्रक्रिया:
रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, कौशल्य चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीच्या आधारे केली जाईल.
1. लेखी परीक्षा:
- प्रश्नपत्रिकेचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, इंग्रजी/हिंदी, संबंधित विषय
- एकूण गुण: 100
2. कौशल्य चाचणी:
- टायपिंग टेस्ट / भाषांतर कौशल्य (Junior Translator साठी)
- शिक्षक पदांसाठी अध्यापन कौशल्य परीक्षा
3. दस्तऐवज पडताळणी:
- पात्र उमेदवारांची अंतिम यादी मूल कागदपत्रांच्या पडताळणीनंतर जाहीर केली जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत संकेतस्थळ www.rrb.gov.in ला भेट द्या.
- “RRB Ministerial Bharti 2025” लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करा व लॉगिन करून अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू: 06 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
- परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
महत्वाचे लिंक:
IMPORTANT LINKS | |
Advertisement ( PDF ) | CLICK HERE |
APPLY ONLINE LINK |
CLICK HERE |
Official website | CLICK HERE |
JOIN US | TELEGRAM |